Pune Traffic Rank 2022: पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात ६ व्या क्रमांकावर; १० किमी जाण्यासाठी लागतोय इतका वेळ..

Tomtom Traffic Index Ranking: या सर्वेमध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूरू आणि दिल्ली शहराचाही समावेश आहे.
Pune Traffic Rank 2022
Pune Traffic Rank 2022Saamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Traffic Rank 2022: शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे (Pune) शहर राज्यात वाहतूक कोंडीच्या बाततीत अग्रेसर आहे. पुण्यात ट्राफिकची समस्या काही नवीन नाही. दिवसेंदिवस पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

मात्र याच वाहतूक कोंडीची दखल आता संपूर्ण जगात पोहचली आहे कारण जागतिक वाहतूक कोंडीत पुण्याने जगात 6 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. नेदरलँडमधील एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Pune Traffic Rank 2022
Parola Bajar samiti: विद्यमान सभापतींना धक्‍का; शिंदे गट आमदाराचा पराभव करत ‘मविआ’चे वर्चस्व

याबाबत अधिक माहिती अशी की, टॉम टॉम या खासगी कंपनीने जागतिक वाहतूक कोंडीचा (Traffic Issue) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्ह करून हा अहवाल तयार करण्यात आला असून यामध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे शहर जगात 6 व्या क्रमांकावर आले आहे.

१० किलोमीटर जाण्यासाठी लागतोय इतका वेळ...

या सर्वेमध्ये १० किलोमीटर प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो यावरुन ही आकडेवारी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये पुणे शहरात 10 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 28 मिनिटे वेळ लागतो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गेल्या वर्षी पुणे शहरातील प्रवासाचा वेळ वाढल्याचे या सर्वेमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये 10 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 1 मिनिट 10 सेकंदांनी वाढला आहे.

Pune Traffic Rank 2022
Sanjay Raut On Amit Shah: 'आमच्या सभेचा जोश पाहायला केंद्रीय गृहमंत्री येणार असतील तर...', संजय राऊत यांचा अमित शाह यांना टोला

ही आहेत वाहतूक कोडींची कारणे...

पुण्यात आज जवळपास ४५ लाख वाहनं असून यात ३५ लाखांपेक्षा जास्त दुचाकी असून ८ लाख चारचाकी आहेत. खाजगी वाहनांचा बेसुमार वापर, शहरात सुरु असलेले मेट्रोचे, उड्डाणपुलाची कामं, पीएमपीएल ची परिस्थिती हे या वाहतूककोंडीचे काही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय बेशिस्त वाहनधारक, बेशिस्तपणे पार्किंग वाहतूक, नियमांचे उल्लंघन, पोलिसांची कमतरता यामुळे देखील सामान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com