Parola Bajar samiti: विद्यमान सभापतींना धक्‍का; शिंदे गट आमदाराचा पराभव करत ‘मविआ’चे वर्चस्व

विद्यमान सभापतींना धक्‍का; शिंदे गट आमदाराचा पराभव करत ‘मविआ’चे वर्चस्व
Parola Bajar samiti
Parola Bajar samitiSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखालील (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीच्या मार्केट बचाव पॅनलने १५ जागा मिळवून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना शिंदे गटाच्या जयकिसान पॅनलला ३ जागा मिळाल्या. विद्यमान बाजार समिती (Bajar Samiti) सभापती अमोल चिमणराव पाटील यांना ३१६ मते मिळाली असून, ते पराभूत झाले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांना ४०२ मते मिळाली असून, ८६ मताधिक्याने विजयी झाले आहे. सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसामान्य गटातून माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना ४७६ मते मिळाली असून, ते विजयी झाले आहेत. (Tajya Batmya)

Parola Bajar samiti
Jalgaon Crime News: चारित्र्याचा संशय; मुलाने जन्मदात्रीला संपविले

निवडणूक यशस्वितेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सिंहले तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पारोळा मंडळ अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, येथील चुरशीच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्रीने विजय संपादन केल्याने बाजार समिती ते महामार्ग तसेच कजगाव रस्ता ते माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणुकीसह गुलालांची उधळण करण्यात आली.

Parola Bajar samiti
Dhule Bajar samiti Election: कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व

केवळ तीन जागांवर विजय

पारोळा (Parola) बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे मार्केट कमिटी बचाव पॅनल व शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांचे जयकिसान पॅनलमध्ये सरळ लढत झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनल ला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com