Kolhapur Kalamba Jail News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: कळंबा कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे मोबाइल सापडले; तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ पोलीस निलंबित

Satish Daud

Kolhapur Kalamba Jail News

कोल्हापूर शहरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तब्बल ७५ हून अधिक कैद्यांकडे मोबाइल सापडले. हा प्रकार उघडकीस येताच शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी २ अधिकाऱ्यांसह ९ पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, अभिजित गोसावी, वैभव पाटील, रवी पवार, अनिकेत आल्हाट, सुहास वरखडे, संजय टिपगुडे, स्वप्नील हांडे, वैशाली पाटील, अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

मागील काही दिवसांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे सतत मोबाइल सापडून येण्याच्या घटना घड आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांच्या विशेष पथकाने कारागृहातील कैद्यांची झाडाझडती घेतली होती.

यावेळी खुल्या जागेत, भिंतीत, स्वच्छतागृहात आणि काही बॅरेकच्या कोपऱ्याजवळ मोबाइल लपवण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार उघड होताच कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीत कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT