Pune News: आईच्या कुशीतून चोरलेलं ७ महिन्याचं बाळ सापडलं; पुणे पोलिसांनी २४ तासांतच आरोपीला शोधलं

Pune Breaking News: आईच्या कुशीतून अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेलं ७ महिन्यांचं बाळ बंडगार्डन पोलिसांनी शोधून काढलं आहे.
Pune 7 months old baby Kidnapping
Pune 7 months old baby Kidnapping Saam TV

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

Pune 7 months old baby Kidnapping

आईच्या कुशीत झोपलेलं ७ महिन्यांचं बाळ अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. शनिवारी (ता. २७) घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

Pune 7 months old baby Kidnapping
Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे. आरोपीने चोरलेलं बाळ एका व्यक्तीला विकलं होतं. त्याला देखील पोलिसांनी विजापूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं असून बाळाची सुखरुप सुटका केली आहे.

चंद्रशेखर मलकप्पा नलूगंडी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं पुणेकर कौतुक करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी असलेले अजय तेलंग आपल्या पत्नी आणि बाळासह नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते.

शनिवारी (ता. २७) मध्यरात्री तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा ७ महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले.

त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुजेटच्या माध्यमातून तपास करत आरोपीचा शोध घेतला.

आरोपी बाळाला चारचाकी वाहनातून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी विजापूर येथून एका हॉटेलमधून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. चोरून बालकांची विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी गजाआड केलं आहे.

Pune 7 months old baby Kidnapping
Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com