kolhapur Sangola Businessman Robbery News AI
महाराष्ट्र

Kolhapur : हायवेवर अर्ध्या रात्री थरार! जे कुणासोबतही कधीच घडू नये ते व्यापाऱ्यासोबत घडलं....

Kolhapur News : सांगोल्यात मध्यरात्री व्यापाऱ्याची कार अडवून अज्ञातांनी अडीच लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सांगोल्यात व्यापाऱ्याची कार अडवून दरोडा

  • अडीच लाखांची रोकड आणि मोबाईल लुटले

  • थार गाडीतून आलेले चार आरोपी फरार

  • पोलिसांकडून तपास सुरू

भरत नागणे, पंढरपूर

kolhapur Sangola Businessman Robbery News कोल्हापूरच्या एका व्यापाऱ्याची गाडी अडवून अज्ञात चार जणांनी लुटल्याची धक्कादायक घटना सांगोल्यात मध्यरात्री घडली आहे. यामध्ये चोरांनी तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड व मोबाईल चोरून नेला आहे. या प्रकरणी व्यापारी दिलीप भागोजी पाटील, यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांचे कोल्हापूर येथे वाहनांचे स्पेअर पार्टचे दुकान असून ते व्यवसायानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी पैसे घेऊन जात होते. यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सत्यकला व चालक रामचंद्र साळुंखे होते. त्यांच्या कारच्या डिकीत दोन कपड्यांच्या बॅगांमध्ये अडीच लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सांगोला हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवण करून ते पुढे निघाले.

दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास सांगोला येथील उड्डाणपूल जवळ त्यांच्या कारच्या मागून आलेल्या काळ्या रंगाच्या, विना नंबरच्या ‘थार’ गाडीने अचानक कट मारत गाडी अडवली. थारमधून उतरलेल्या एका व्यक्तीने चालकाजवळ येत वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी आणखी तीन जण कारजवळ आले.

या चौघांनी पाटील व चालकाला धमकावत झटापट केली. त्याचवेळी दोघांनी कारची डिकी उघडून दोन बॅगा काढून घेतल्या. त्या बॅगांपैकी एका बॅगेत अडीच लाख रुपयांची रोकड होती. तसेच चालकाचे दोन मोबाईल फोनही हिसकावून घेण्यात आले. लुटीनंतर आरोपी थार गाडीत बसून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. या घटनेमुळे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. मानसिक स्थिती सावरल्यानंतर त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT