Kolhapur News  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव येथे आज सकाळी दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. दुचाकीस्वाराच्या अचानक मृत्यू झाल्याने गावभर त्याच्या हत्येची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील नवे पारगाव येथे सकाळी नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला होता. नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. मृतदेह आढळल्यानंतर त्यांची हत्या झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी तातडीने नितीन भोसले यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता. मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणाचा काहीच सुगावा लागत नव्हता.

दरम्यान, नितीन भोसले यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या अंगावर भाजल्याचा जखमा आढळून आल्या. तसेच फुफ्फुसही जळल्याचे आढळले. त्यामुळे अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद दाखल केली.

चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावात काही दिवसांपूर्वी एका चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. त्याची हत्या करून सुमारे 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झालं. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत;ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, आता परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? फडणवीस-ठाकरेंची मातोश्रीवर भेट? कुणी केला दावा? पाहा व्हिडिओ

Marathi News Live Updates : कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची हत्या करण्याचा कट; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा आरोप

Village In India : ऐकावं ते नवलच.. 'या' गावात कोणाच्याच घरात चूल पेटत नाही

SCROLL FOR NEXT