kolhapur, Rs 2000
kolhapur, Rs 2000 saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : दोन हजार रुपयांची नोट स्वीकारण्यास डाॅक्टरांचा नकार, चाैकशीअंती कारवाई हाेणार

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : रुग्णाकडील दोन हजार रुपयांची नोट घेण्यास नकार देऊन उर्मट वर्तणुक करणाऱ्या तसेच या नोटेच्या बदल्यात औषध देण्यास नकार देणाऱ्या कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर प्रद्युमन वैराट (dr pradyumna vairat) यांच्यावर काेल्हापूर महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाने कायद्याचा बडगा उभारला आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात नाक कान घसा तज्ञ डॉक्टर प्रद्युम वैराट यांचा दवाखाना आहे. काल एक रुग्ण घशाचा त्रास होत असल्याच्या कारणावरून डॉक्टर वैराट यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. यावेळी डॉक्टरांकडून उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला औषधांची प्रिस्क्रीप्शन दिली.

डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रीप्शन घेऊन रुग्णाने आजूबाजूला असलेल्या सर्व मेडिकल दुकानांमध्ये या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी दिलेली औषधं ही केवळ त्यांच्या दवाखाना शेजारी असलेल्या केबिन वजा मेडिकल मध्येच मिळतात अशी माहिती मिळाली.

त्यामुळे हे रुग्ण पुन्हा त्या रुग्णालय परिसरात असणाऱ्या मेडिकल दुकानामध्ये आले. यावेळी डॉक्टरांच्या औषधाची प्रिस्क्रीप्शन प्रमाणे त्यांना 881 रुपयांची औषध देण्यात आली. औषध मिळाल्यानंतर रुग्णाने आपल्याकडे दोन हजार रुपयांची नोट त्यांना देऊ केली. यावेळी मेडिकल चालकांनी आपण दोन हजार रुपयाची नोट स्वीकारू शकत नाही, आपल्याला औषध हवी असतील तर डॉक्टरांसोबत बोला असे ठणकावून सांगितले.

या संदर्भात या रुग्णांनी डॉक्टरांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 हजार रुपयांची नोट आपण स्वीकारत नसल्याचं डॉक्टरांनी सुद्धा सांगितल्याने या रुग्णाला अखेर या डॉक्टरांनी औषध दिली नाही.

त्यामुळे रुग्णांने थेट मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडेच तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे चौकशी सुरू केली.

यावेळी बातमीसाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना देखील रुग्णालयातील कडून महिला डॉक्टरांकडून उर्मट वागणूक देण्यात आली. यावेळी रुग्णालयात लावण्यात आलेल्या अनेक आक्षेपार्ह सूचनांवर अधिकाऱ्यांनी विचारणा केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT