Kolhapur Loksabha Election 2024 SamarjitSinh Ghatge Name Ahed by BJP Against Shahu Maharaj Chhatrapati  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Loksabha Election: कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचा मोठा डाव! शाहू महाराज छत्रपतींना समरजितसिंह घाटगे आव्हान देणार?

Shahu Maharaj Chhatrapati Vs SamarjitSinh Ghatge: शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ९ मार्च २०२४

Kolhapur Loksabha Election 2024:

कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरतील.

शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता छत्रपती शाहू महाराजांना शह देण्यासाठी भाजपने मोठा डाव टाकला असून त्यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगेंना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती शाहू महाराजांविरोधात सरमजीत घाटगे?

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने कोल्हापूरच्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा पुढ आणली जात आहे. अशातच आता महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या नावाऐवजी आता भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. या चर्चेवर समरजितसिंह घाटगेंनी मात्र यावर प्रतिक्रिया देणं टाळले आहे. आपण भाजपचा प्रोटोकॉल पाळणारा व्यक्ती असल्याचे सांगत सध्या त्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे.

संजय मंडलिकांचा पत्ता कट?

मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे मंडलिक आपणच उमेदवार असेल असं सांगत असले तरी दुसरीकडे मात्र कोल्हापुरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवरती अनेकांनी भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSinh Ghatge) यांच्या नावाला पसंती दिल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शाहू महाराज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. समरजित घाटगे यांनी उमेदवारी दिल्यास दोन्ही राज घराण्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळी समरजित घाटगे यांचं नाव चर्चेत आल्याने कोल्हापूर लोकसभे बाबत उत्सुकता वाढली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

SCROLL FOR NEXT