महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापनदिन. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे. आजच्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात काय भूमिका घेणार? नेत्यांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महायुतीसोबत जाण्याच्या चर्चांवर महत्वाचे विधान केले आहे.
सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण.. संदीप देशपांडेचे सूचक विधान?
"आज मनसेसाठी (MNS) भावनिक दिवस आहे. पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल याबद्दल राज ठाकरे मार्गदर्शन करतील. नवी दिशा, नवीन पहाट आणि नवीन विचार घेऊन आम्ही जाणार आहोत. मनसे महायुतीसोबत जाणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे राज साहेबांच्या भाषणातून मिळतील. असे म्हणत पक्षाला 18 वर्षे झालीत. 18 वर्षात जे घडले नाही ते यापुढे घडेल. आमचं मार्गक्रमण सत्तेच्या दिशेने असेल एवढं निश्चित!" असे सूचक वक्तव्यही संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले आहे.
अविनाश जाधवांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया...
"जो राजकारणात काम करतो त्याला सत्तेत जाण्याची इच्छा असते. 18 वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय. मागच्या पाच - सात वर्षात पक्षाने वाईट काळ बघितला आहे. मात्र उगवणारा सूर्य मनसेचा असेल. युती आघाडी या बाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही चालतो. राज ठाकरे मेळाव्यात किंवा सभेत काय बोलणार हे अगोदर फक्त देवाला आणि साहेबांनाच माहीत असते. साहेब काय बोलतील याची आम्हालाही उत्सुकता आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वसंत मोरे काय म्हणाले?
"नाशिकचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मनसेचा बालेकिल्ला आहे. मनसैनिक २४ तास लढण्यासाठी तयार असतात. भाजपसोबत जायचं की नाही हे राज ठाकरेचं (Raj Thackeray) ठरवतील. राज ठाकरे जी भूमिका घेतील, जो आदेश देतील त्याचं आम्ही सर्व मनसैनिक पालन मी नाराज नाही, शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट फक्त माझ्या प्रभागातील मैदानाचे आरक्षण वाचवण्यासाठी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.