Jalana IT Raid: २० पथके, तब्बल १५० अधिकारी, अन् तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी; जालन्यात काय घडतयं?

Jalana Breaking News: आयकर विभागाच्या 20 पथकांच्या तब्बल १५० अधिकाऱ्यांकडून जालन्यामध्ये तीन दिवसांपासून तपासणी सुरु आहे. शहरातील 10 उद्योजक तसेच बड्या व्यापाऱ्यांच्या घरी हे धाडसत्र सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jalana Breaking News
Jalana Breaking NewsSaamtv
Published On

Jalana IT Raid Updates:

जालन्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे धाड सत्र सुरू आहे. आयकर विभागाच्या 20 पथकांच्या तब्बल १५० अधिकाऱ्यांकडून जालन्यामध्ये तीन दिवसांपासून तपासणी सुरु आहे. शहरातील 10 उद्योजक तसेच बड्या व्यापाऱ्यांच्या घरी हे धाडसत्र सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना शहरातील औद्योगिक वसाहत आणि मोढा परिसरातील काही व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाची 20 पथकांकडून धाड सत्र सुरु आहे. आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील 10 उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडे हे धाड सत्र सुरु आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे,नागपूर च्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या 60 कार मधून आलेल्या 150 कर्मचाऱ्याकडून ही कारवाई केल्या जात असंल्याची माहिती समोर आली.

शहरातील उद्योजक आणि व्यापारी सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. गुरुवारी भल्या पहाटे आलेल्या आयकर विभागाच्या दीडशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या दहा उद्योजक व्यापाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. सध्या उद्योजक व्यापाऱ्याच्या घरातील आणि कार्यालयातील कागदपत्रांची,बँकेतील ठेवींची, आणि त्यांच्या स्थावर मालमत्तेची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Jalana Breaking News
Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाई; 450 हून अधिक टँकरने भागवली जातेय तहान

येत्या दोन ते तीन दिवसात आयकर विभागालाया धाडी सत्रातून काय हाती लागले हे समोर येईल. विशेष म्हणजे या व्यापारी आणि उद्योजकांच्या संपर्कात असणाऱ्या आणि आर्थिक व्यवहार झालेल्या ग्रामीण भागातील व्यक्तींचे संशयास्पद व्यवहार तपासण्यासाठी अनेक पथके ग्रामीण भागात खेडोपाडी जाऊन तपास करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Jalana Breaking News
Bhavana Gawali: भावना गवळींना शह देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लान; हुकमी एक्का मैदानात उतरणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com