Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाई; 450 हून अधिक टँकरने भागवली जातेय तहान

Aurangabad Water Shortage : कडाक्याचा उन्हाळा सुरू होण्याआधीच अशी परिस्थिती ओढावल्याने संपूर्ण उन्हाळा कसा जाणार याबाबत नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
Water Shortage
Water ShortageSaam TV
Published On

रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar :

मार्च महिन्याला सुरूवात होताच छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)आणि जालन्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील 520 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेय. तर चार जिल्ह्यात 450 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कडाक्याचा उन्हाळा सुरू होण्याआधीच अशी परिस्थिती ओढावल्याने संपूर्ण उन्हाळा कसा जाणार याबाबत नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.

Water Shortage
Drinking Water : वयानुसार दररोज किती पाणी प्यायला हवं

मिळालेल्या अधिक महितीनुसार, मराठवाड्यात आतापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेय.

सध्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वाधिक 279 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यातील 520 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेय. सद्य स्थितीत संभाजीनगरातील 126 गावे आणि 29 वाड्यांना 189 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर जालना जिल्ह्यातील 70 गावे आणि 26 वाड्यांमध्ये 129 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पाण्यासाठी गावकऱ्यांना करावी लागतेय कोसोदूर भटकंती

धाराशिवच्या परंडा तालुक्यातील जवळा निजाम या गावातील ग्रामस्थांना देखील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धाराशिवमधील अनेक गावातील जलस्ञोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

पाण्याअभावी वयोवृद्ध महीलांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, पाणी टंचाईबाबत उपाययोजना राबविण्यात ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याने नागरीकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन विहीरी आणि कुपनलिका अधिग्रहन करून जवळा निजाम या गावचा पाणी प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Water Shortage
Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये सस्पेन्स वाढला, त्यात रावसाहेब दानवेंनाही 'नो गॅरंटी'; उमेदवार नक्की कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com