rahul rekhawar 
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी रेखावार यांच्या आदेशाला काेलदांडा (व्हिडिओ पहा)

दरम्यान कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा उदासीन का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संभाजी थोरात

काेल्हापूर : महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील कागल तपासणी नाक्यावर परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून येणा-या नागरिकांचे काेविड १९ च्या आरटी-पीसीआर अहवालाचे अथवा लसीकरण झाल्याची तपासणी करण्यासाठी काेणतीच यंत्रणा नसल्याचे चित्र आज (बुधवार) आहे. यामुळे काेल्हापूरच्या जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखविलेचे दिसते.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या राज्यांच्या सीमांवर तपासणी नाके उभे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकत्याच दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या २४ तासानंतर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कागल चेक पोस्टवर कोणतीच यंत्रणा कार्यरत नसल्याचं धक्कादायक चित्र आहे

त्यामुळे आजही अनेक वाहन विना तपासणी जिल्ह्यात येत आहेत. एका बाजूला कर्नाटक सरकाराने कोगनोळी टोल नाका परिसरात तपासणी नाके उभारून rt-pcr चा तपासणी अहवाल किंवा लसीकरण झालेल्या नसलेल्या प्रवाशांना पुन्हा पाठवत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा उदासीन का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT