महाराष्ट्राच्या लेकीनं दूसरा दिवस गाजविला; आदितीचा 'सुवर्ण' वेध

राष्ट्रीय स्पर्धेत आदितीने उत्तम कामगिरी केल्याने साता-यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
archer aditi gopichand swami
archer aditi gopichand swami
Published On

सातारा ntpc sub junior national archery championship : अमरावती येथे सुरु असलेल्या ३८ व्या NTPC राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या आणि मुलींच्या धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या (satara) आदिती गाेपीचंद स्वामी हिने कंपाऊंडमध्ये १४५ गुण प्राप्त करीत सुवर्णपदक पटकावून स्पर्धेतील दूसरा दिवसही गाजविला आहे. गुरुवारी आदितीने राैप्यपदक मिळविले हाेते. आज झालेल्या स्पर्धेत आदितीने (aditi gopichand swami) तेलंगणाच्या तानी प्रिती हिला (१४० गुण) मागे टाकले.

archer aditi gopichand swami
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

पहिल्या फेरीत आदिती आणि तानी प्रिती यांचे गुण २९-२९ असे समान राहिले. त्यानंतर आदितीची ५८ गुण तर तानी प्रितीची ५६ गुण झाले. तिस-या फेरीत आदितीचे ८७ तर तानी प्रितीचे ८४ गुण हाेते. त्यानंतर ही आदितीने आपले कसब दाखवित ११५ गुणांपर्यंत मजल मारली तर तानी प्रितीचे ११२ गुणांवर हाेती. अखेरच्या टप्प्यात आदितीने अचूक वेध घेत १०,१०, १० अशी हॅट्रीक साधत सुवर्णपदकावर माेहाेर उमटवली. तानी प्रितीने १४० गुण मिळवीत राैप्यपदक मिळविले. ही स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे अशी माहिती भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी दिली.

दरम्यान साता-याची असलेल्या आदिती स्वामीने archer aditi gopichand swami बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या १९ व्या राज्यस्तरीय सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले हाेते. राष्ट्रीय स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी आदितीने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या सुवर्णवेधाने साता-यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com