Hupari Video : चिकन विक्रेत्याकडून पत्नीची क्रूर हत्या; सत्तुराने केले शरीराचे तुकडे!  SaamTvNews
महाराष्ट्र

Hupari Video : चिकन विक्रेत्याकडून पत्नीची क्रूर हत्या; सत्तुराने केले शरीराचे तुकडे!

अंगात सैतान घुसलेल्या नवऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी समीना आक्रोश करत होती. पण, माणुसकी हरवलेल्या गर्दीत एकाही माणसाला दयेचा पाझर फुटला नाही. काहींनी घटनेचा व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली!

Krushnarav Sathe, संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ (Hupari Murder Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीची चारचौघात धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली (Murder by Husband) आहे. हि धक्कादायक घटना 25 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा :

हुपरीमध्ये चारचौघात समिना इम्तियाज नदाफ या महिलेची झालेली हत्या (Murder) अत्यंत हृदयद्रावक आहे. कारण, अत्यंत क्रूरतापुर्वक हत्या होत असताना घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, जीव वाचवण्यासाठी आर्त हाक देणाऱ्या समिनाला वाचवायचे धाडस या गर्दीतील एकालाही झालं नाही. उलट लोकांनी ह्या घटनेचा व्हिडीओ (Video) काढण्यात धन्यता मानली. (Kolhapur Hupari Murder Video Goes Viral)

असा घडला थरार :

इम्तियाज राजू नदाफ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. इम्तियाज व समिना या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. इम्तियाजला दारूचे व्यसन देखील आहे. तसेच त्याचा चिकन (Chicken) विक्रीचा व्यवसाय देखील आहे. समिना नदाफ या देखील हा व्यवसाय सांभाळतात. २५ जानेवारीला चिकनच्या दुकानावर समिना चिकन विक्री करत असताना, संध्याकाळी 9.30च्या सुमारास इम्तियाज दारू पिऊन तिथे आला. याहीवेळी दोघांत कोणत्यातरी कारणावरून खटका उडाला. हाच वाद विकोपाला गेला.

पती-पत्नीचे भांडण सुरु झाल्यावर दारूच्या नशेत असलेल्या इम्तियाजने पत्नी (Wife) समिनावर चिकन तोडण्याच्या सत्तुराने हल्ला केला. भयभीत झालेल्या समिना जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने धावत सुटल्या. (त्यांचे दुकान ज्या परिसरात आहे, तो परिसर देखील गर्दीचा असून हा थरार घडत असताना तिथे बऱ्यापैकी लोक उपस्थित होते.) घाबरलेल्या अवस्थेत समिना ह्या शेजारीच असलेल्या टेलरच्या दुकानात लपण्यासाठी पळत गेल्या. मात्र, इम्तियाजने त्यांचा पाठलाग करत त्यांना गाठले. आणि तिथेच त्यांच्यावर धारदार सत्तुराने असंख्य वार करत हत्या केली.

हा सर्व प्रकार घडत असताना समिना यांचे वडील घटनास्थळी होते. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या लेकीची हत्या होत असताना त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने इम्तियाजने समिनाच्या वडिलांवर देखील हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हातावर वार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पती इम्तियाजला बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या थरारत माणुसकी हरवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दारूच्या नशेत असणाऱ्या इम्तियाजला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. मात्र, या असंवेदनशील गर्दीने आपल्या मोबाईमध्ये हा सगळा दुर्दैवी प्रकार रेकॉर्ड करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : भाजी खूप तिखट झाली? पटकन करा 'हा' उपाय, चव बिघडणार नाही

सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले; दिवाळी पाडव्याला जोडीदारासाठी घ्या गिफ्ट ; पाहा आजचा लेटेस्ट भाव

Shocking News : मानवतेला काळिमा! उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स व्यस्थ, VIP प्रोटोकॉलमुळे महिलेचा मृत्यू

MHADA HOME: स्वस्तात घर खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडा बांधणार ७ लाख घरं; कोणत्या ठिकाणी किती सदनिका?

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

SCROLL FOR NEXT