Shocking News saam tv
महाराष्ट्र

Shocking News: साखळदंडाने बांधून कुलूप लावलं, महिलेला ४० दिवस घरात डांबून ठेवलं; कोल्हापूरातील धक्कादायक घटना| VIDEO

Kolhapur Police: कोल्हापूरमध्ये महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं आणि कुलूप लावलं. तब्बल ४० दिवस या महिलेला घरात डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या महिलेची सुटका केली.

Priya More

कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे ही घडना घडली. एका ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले. महत्वाचे म्हणजे या महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरात असलेल्या दौलतनगर भागातील ही घटना आहे. या ठिकाणी एक दोन मजली घर आहे. या घरामध्ये गेल्या महिनाभरापासून ४० वर्षीय सारिका साळी या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी आज अचानक त्या घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली . ही महिला खूपच अशक्त झाली आहे.

पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून ठेवत त्याला मोठं कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांनी या महिलेची सुटका करत तिच्या गळ्यातील आणि पायातील साखळी काढून तिला रुग्णालयात नेले. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, 'भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवलं होतं. त्यांनी मला चांगल्यासाठी बांधून ठेवलं होतं.'

या महिलेच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले की, 'महिलेच्या घरातील सर्वजण कामासाठी बाहेर जातात. ही महिला वेडसर आणि अपंग असल्यामुळे घरातील लोकांनी तिला बांधून ठेवलं. बाहेर गेल्यावर ती दगड मारणे, बडबडणे असं कृत्य करते म्हणून घरातल्यांनी वैतागून तिला बांधून ठेवलं.' पोलिसांनी महिलेला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात नेलं. ती खूपच अशक्त झाली आहे.

ही बातमी जेव्हा साम टीव्हीने दाखवली तेव्हा याची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयंत म्हणून ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला संजय पवार यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत जाब विचारला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत संशयित तरुणाची सुटका करून त्याला पोलिस ठाण्याच्या दिशेने घेऊन गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT