Crime
CrimeSaam tv

Kolhapur: गर्लफ्रेंडच्या कुटुंबाला प्रियकराकडून पिस्तूलाचा धाक, माजी उपसरपंचाच्या मुलगा ताब्यात, परिसरात खळबळ

Crime News Kolhapur: प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीन मुलाने प्रेयसीच्या कुटुंबीयांना धमकावण्यासाठी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवला. ही धक्कादायक घटना कोल्हापूर शहर परिसरात घडली.
Published on

राज्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना धमकावण्यासाठी एका अल्पवयीन प्रेमवीरानं गावठी पिस्तुलाचा वापर केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याला पिस्तूल पुरवणाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.

ऋतुराज दत्तात्रय भिलूकडे असे आरोपीचे नाव असून, तो माजी उपसरपंचांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानेच आरोपी मुलाला पिस्तूल पुरवल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे एका मुलीवर प्रेम होते. प्रेयसीच्या कुटुंबाला धमकावण्यासाठी प्रियकराने पिस्तूलीचा वापर केल्याची माहिती आहे.

Crime
Nagpur Crime: दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात

या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ आरोपींना अटक केली. तसेच गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पिस्तुलाचा वापर यापूर्वी इतर कोणत्या घटनांमध्ये झाला आहे का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime
BF ला किस करताना वडिलांनी पाहिलं, १८ व्या वर्षी बनली ADULT स्टार; आता बॉलिवूड गाजवतेय

शहरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती आणि हिंसक वर्तन चिंतेचा विषय बनला असून, या घटनेने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

Crime
BF ला किस करताना वडिलांनी पाहिलं, १८ व्या वर्षी बनली ADULT स्टार; आता बॉलिवूड गाजवतेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com