Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime : कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या ९ जणांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर पोलिसांनी गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Kolhapur crime News : कोल्हापूर पोलिसांनी गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २ ठिकाणी बुधवारी गर्भलिंग निदान प्रकरणी छापे टाकण्यात आले होते. बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केलेली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मडीलगे आणि राधानगरी इथं आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या वतीने छापे टाकण्यात आला होता. बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडले होते.

बेकायदेशीर गर्भ निदान प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मडीलगे येथे गर्भलिंग निदानचे मशीन,गर्भपाताची औषधे सापडली होती. राधानगरी मध्येही सोनग्राफी मशीन पकडले होते.या प्रकरणी भुदरगड पोलिसांत पीसीपीएनडिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला आहे.

राधानगरीमध्येही सोनग्राफी मशीन पकडले होते. या प्रकरणी भुदरगड पोलिसांत पीसीपीएनडिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथल्या गर्भ निदान चाचणी प्रकरणी भुदरगड पोलिसांनी काल रात्री आणखी एका एजंटला अटक केलेली आहे.

राधानगरी इथल्या सर्जेराव पाटील या एजंटला बदरगड पोलिसांनी (Police) अटक केलेली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

कोल्हापूर बनलंय गर्भलिंग निदान चाचणीचं हब

पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड आणि राधानगरी येथील गर्भलिंग निदान चाचणी केंद्राचं बिंग फोडलं. पोलिसांनी या केंद्रावर पेशंट बनून छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना छाप्यात गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन आणि गर्भपाताची औषधे पोलिसांच्या हाती लागली.पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज विदर्भातील शाळेचा पहिला दिवस, सुट्टीनंतर आज शाळांमध्ये गुंजणार किलबिलाट

युरोपात भीषण उष्णतेनं हाहाकार, उष्णतेनं युरोपमध्ये 1300 जणांचा बळी

राम मंदिरातील चोरीत बँक कर्मचारी? मंदिरातील चोरीच्या पैशांवर आरोपींचे बंगले

10, 20, 50 आणि 100 च्या जुन्या नोटा बंद होणार? RBI कडून 2005 पूर्वीच्या नोटांवर बंदी?

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! सरकारचा पहिला वादा फसला; कृषिमंत्र्यांकडून आता नवी डेडलाईन

SCROLL FOR NEXT