युरोपात भीषण उष्णतेनं हाहाकार, उष्णतेनं युरोपमध्ये 1300 जणांचा बळी

Deadly Heatwave in Europe Raises Global Warming Concerns: युरोपमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं शेकडो जणांचे बळी गेले आहेत. युरोपमध्ये कशामुळे अचानक तापमान वाढलं ? भारतावरही याचा परिणाम होतोय का? भारतातही तापमानाचा पारा वाढणार का? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.........
Scorching heatwave grips Europe as temperatures soar beyond normal, causing widespread fatalities and climate concerns.
Scorching heatwave grips Europe as temperatures soar beyond normal, causing widespread fatalities and climate concerns.saam tv
Published On

भारतीय युरोपात थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. मात्र थंड सोडा...युरोपातल्या देशांमध्ये यंदा उष्णतेचा हाहाकार सुरू आहे. आम्ही असं का म्हणतोय... त्यासाठी उत्तर प्रदेशातल्या ४५ डिग्री तापमानात राहिलेला या मुलीचा हा व्हिडीओ आधी नीट पाहा आणि ऐका..

ऐकलंत... या तरुणीनं जर्मनीतील 33 डिग्री तापमान भारतीयांनाही असह्य होऊ लागलंय..त्यामुळे केवळ ३० डिग्री तापमानही युरोपियन नागरिकांच्या जीवावर उठू लागलंय.....आतापर्यंत शेकडोंचा जीव गेलाय. युरोपात उष्णतेच्या लाटेनं काय परिस्थिती निर्माण झालीये पाहा...

उष्णतेनं युरोपमध्ये 1300 जणांचा बळी

युरोपातील अनेक देशांमध्ये तापमानाचा पारा 30 ते 35 डिग्रीवर गेलाय.

गेल्या 10 दिवसांत 1300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय.

एकट्या फ्रान्समध्ये भीषण उष्णतेमुळे तब्बल 1 हजार जण दगावलेत.

उष्णतेमुळे महामार्गांवरील रस्ते वितळू लागल्यानं काही मार्ग बंद करावे लागले.

जंगलामध्ये वणवे पेटले असून जागतिक हवामान संघटनेनुसार,जगात यूरोप सर्वाधिक वेगानं उष्ण होतोय.

युरोपच्य़ा जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये उष्णतेनं दशकातील तापमानाचे सगळेच विक्रम मोडले आहेत. खरंतर, अल निनोच्या प्रभाव आणि जल-वायू परिवर्तनामुळं जगभरातील अनेक देशांमध्ये प्रचंड उष्णता वाढली आहे. भारतातही अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता 80 टक्के आहे. भारतातील मान्सून सध्या अल निनोच्या विळख्यात अडकला असून देशातील अनेक भागांत पावसानं पाठ फिरवलीय. त्यामुळे युरोपातील उष्णतेच्या लाटेचा भारतालाही धोका निर्माण झालाय. आणि संपूर्ण देशावर दुष्काळाचं सावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com