10, 20, 50 आणि 100 च्या जुन्या नोटा बंद होणार? RBI कडून 2005 पूर्वीच्या नोटांवर बंदी?

Old Currency Notes Ban Fact Check Rbi Truth: आता दावा करण्यात आलाय की 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार आहेत...RBIनेच जुन्या नोटांबाबत नोटिफिकेशन जारी केल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Viral claim about old Indian currency notes sparks confusion, RBI clarifies no such ban.
Viral claim about old Indian currency notes sparks confusion, RBI clarifies no such ban.saam tv
Published On

जुन्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद केल्या जाणार आहेत असा दावा करण्यात आलाय...सोशल मीडियावर वेगानं मेसेज व्हायरल होतोय...यामुळे एकच खळबळ उडालीय...पैसे हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा विषय आहे...त्यामुळे या मेसेजमागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे...पण, खरंच 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत का...? असा सवाल उपस्थित होतोय...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद केल्या जातील. सर्वच नोटांवर बंदी घातली जाणार नाही. 2005 पूर्वी छापलेल्या नोटांवरच बंदी असेल. हा निर्णय RBI ने घेतला असून तो अधिकृतपणे वैध आहे.

या बातमीत किती तथ्य आहे? आणि तसे झाल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे जाणून घेणं गरजेचं आहे...खरंच आरबीआयने असा निर्णय जारी केलाय का...? बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा लोगो असलेलं एक पोस्टर व्हायरल होतंय...त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसतोय...कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी कंपन्या आपल्या ग्राहकांना माहिती देण्यासाठी पेपरमधून निवेदन देतात...तसंच हे नोटिफिकेशन जारी केल्यामुळे संभ्रम निर्माण झालंय...पण, हे खरं नोटिफिकेशन आहे का...? यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने आरबीआयकडून अधिक माहिती मिळवली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

RBI ने 2005 पूर्वीच्या नोटांवर बंदी घातलेली नाही

सगळ्या नोटा कायदेशीररित्या वैध राहतील

नोटांबाबत महाराष्ट्र बँकेने नोटिफिकेशन काढलेलं नाही

चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका

सध्या कुणीही काहीही मेसेज व्हायरल करतं...आणि लोकांची दिशाभूल केली जाते...त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज आल्यास आधी खात्री करून घ्या...कुणालाही असे चुकीचे मेसेज पाठवू नका...नाहीतर यामुळे अनेकांचं नुकसान होऊ शकतं...आमच्या पडताळणीत 10, 20, 50 आणि 100 च्या जुन्या नोटा बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com