Kolhapur University Hostel Room Crime News  Saam Tv News
महाराष्ट्र

गावाहून परतली अन् वसतीगृहात गळ्याला दोर लावला; आयुष्य संपवण्यापूर्वी वडिलांना फोन, कोल्हापूर हादरलं

Kolhapur University Hostel Room: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात २१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. मुलींच्या वसतीगृहात गळफास लावून आयुष्य संपवलं. तरूणी मुळची सांगलीतील रहिवासी.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात २१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

  • मुलींच्या वसतीगृहात गळफास लावून आयुष्य संपवलं

  • कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही

  • पोलिस तपास सुरू, परिसरात खळबळ

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात तिनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गावावरून परतल्यानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, तरूणीनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या घटनेनंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली असून, कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

गायत्री रेळेकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तरूणी मुळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात तरूणी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. मुलींच्या वसतीगृहात रूम नंबर ५४मध्ये राहत होती. तिच्यासोबत इतर २ मुलीही राहत होत्या.

मृत्यूपूर्वी गायत्री तीन दिवसांसाठी गावी गेली होती. ११ ऑगस्ट रोजी ती सांगलीहून कोल्हापूरला परतली. नंतर तिनं वडिलांना फोन केला आणि वसतीगृहात गेली. त्यानंतर तिनं खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास गायत्रीच्या मैत्रिणी वसतीगृहात पोहोचल्या. रूमचा दरवाजा ठोठावला. पण कुणीच दार उघडले नाही.

शंका आल्यानंतर मैत्रिणींनी खिडकीतून पाहिलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. गायत्रीनं ओढणीनं गळफास घेत आयुष्य संपवलं असल्याचं दिसलं. त्यांनी तातडीने सुरक्षारक्षकांना बोलावून घेतलं. सुरक्षारक्षाकांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. तसेच राजारामपूरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.

तसेच गायत्रीच्या कुटुंबाला याची माहिती दिली. रेळेकर कुटुंबाला माहिती मिळताच त्यांना धक्काच बसला. दरम्यान, तपासात पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. तरूणीनं आत्महत्या का केली? याचा शोध पोलिसांकडे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravikant Tupkar: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची राख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवणार|VIDEO

Highest Paid Indian Actors: 'पुष्पराज'समोर खानची जादू फेल; 'हे' आहेत सर्वाधिक मानधन घेणारे १० कलाकार

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर शहरात १५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीसाठी बंदी

Maharashtra Weather : राज्यात पुढील ५ दिवस कोसळधार; कोकणासह विदर्भ, मराठवाड्याला अलर्ट

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

SCROLL FOR NEXT