hasan mushrif & chandrakant patil 
महाराष्ट्र

मुश्रीफांचा दावा न्यायालयात ग्राह्य; BJP प्रदेशाध्यक्षांना दणका

आता पुढील महिन्यात सुनावणी हाेईल.

साम न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी दाखल केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यातून नाव वगळावे अशी याचिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दाखल केली हाेती. ही याचिका कोल्हापुरातील सत्र न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या वकीलांनी आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे नमूद केले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी हसन मुश्रीफ (hasan mushrif) आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी बेनामी कंपनीच्या माध्यमातून निधीचा अपहार केल्याचाही आरोप साेमय्यांनी केला होता. साेमय्या यांनी केलेले आरोप खाेटे आहेत आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी भुमिका मुश्रीफ यांनी घेतली हाेती. तसेच माफी न मागितल्यास न्यायालयात अब्रनुकसानीचा खटला भरणार असल्याचे जाहीर केले हाेते.

साेमय्या यांनी मुश्रीफांची माफी न मागितल्याने मुश्रीफांनी साेमय्यांवर १०० काेटी रुपयांचा दावा दाखल केला. त्या दाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला. या खटल्याची सुनावणी काेल्हापूर (kolhapur) सत्र न्यायालयात नुकतीच सुरु झाली.

ते पक्षाचे प्रमुख आहेत

या दाव्यातून आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली हाेती. पाटील यांनी न्यायालयात दिलेल्या अर्जात मुश्रीफ यांची बदनामी व्हावी यासाठी काेणतेही कृत्य अथवा वक्तव्य केले नसल्याचे म्हटलं हाेते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या पाठींब्या शिवाय साेमय्या असे धाडस करु शकणार नाही असे मुश्रीफ यांचे वकील प्रशांत चिटणीस यांनी न्यायालयात नमूद केले. तसेच पाटील हे संबंधित नेत्याच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांच्या पाठिंब्याशिवाय असे आरोप हाेऊच शकत नाही असेही न्यायालयात सांगितल्याचे चिटणीस यांनी नमूद केले. न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरुन पाटील यांचे नाव खटल्यातून वगळले जाऊ शकत नाही असे स्पष्ट केल्याचे चिटणीस यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात जाणार

कोल्हापूर न्यायालयाने मानहानीच्या दाव्याची सुनावणी निश्चित केली आहे. सोमय्या आणि पाटील या दोघांनाही मुश्रीफ यांच्यावर बदनामी करण्याच्या उद्देशाने कोणतेही आरोप करु नयेत ही मनाई करण्याची आमची मागणी मान्य झालेली आहे. आता पुढील महिन्यात सुनावणी हाेईल असेही चिटणीस यांनी नमूद केले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी आम्ही उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहाेत असे सांगितले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

SCROLL FOR NEXT