Satej Patil, Dhananjay Mahadik  Saam Tv
महाराष्ट्र

रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

संभाजी थोरात

कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'पुढच्या काळात महाभारत घडेल असा इशारा सतेज पाटील यांनी महाडिक यांना दिला होता, यावर सतेज पाटील यांनी आम्ही रामायण घडवणारी माणसे आहोत म्हणत प्रत्युत्तर दिले होते. या टीकेला आता खासदार धनंजय महाडिक यांनीही प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे.

यावर बोलताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, कैकयीने कपटाने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवले होते. त्याच कपटी कारस्थानाचा मी बळी पडलो आणि माझा घात झाला. त्यातून आपण जिल्ह्यात महाभारत होईल असे म्हटले. रामायण रावणामुळे घडवले, ते स्वताला रावण समजतात का? जर राम समजत असतील तर प्रभू रामचंद्र हे एक वचनी होते. आम्हाला रणांगण नवीन नाही पण सत्तेचा उन्माद इतका बरा नसतो, असा टोलाही लगावला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात आता पुन्हा बदल होणार असल्याचा इशारा धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी दिला होता. काही दिवसात कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. दोन्हीकडून या निवडणुकांची तयारी सुरू आहे.

पुन्हा गोकुळ दूध संघ महाडिक गट ताब्यात घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर बोलताना महाडिक म्हणाले, आम्हाला ‘गोकुळ’च्या सत्तेत स्वारस्य नाही. हिसकावून घेण्याची आमची पध्दत नाही, केवळ संघाची अधोगती थांबवणे एवढेच आपले काम आहे, असंही महाडिक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

Rice Chakli Recipe : कुरकुरीत अन् कमी तेलातली तांदळाची चकली, दिवाळीच्या फराळाची रंगत वाढवेल

Maharashtra Rain Alert : दिवाळी संपली तरी पाऊस जाईना, पुढचे २ दिवस महत्वाचे; मुंबईसह २६ जिल्ह्यांना झोडपून काढणार

"जय श्री कृष्णा"; स्मृती इराणींच्या KSBKBT 2मध्ये बिल गेट्स यांची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता, ऑक्टोबरचे ₹१५०० कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT