Anuskura Ghat Traffic Saam TV
महाराष्ट्र

Anuskura Ghat Traffic : मोठी बातमी! अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा

Anuskura Ghat Landslide : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Satish Daud

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज शुक्रवारी पहाटेपासून दरड हटवण्याचे काम सुरू होणार आहे.

सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

दरड कोसळण्याची घटना घडताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घाटाच्या दिशेने धाव घेतली. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू होते. तसेच मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील मागवण्यात आली होती.रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु होते.

मात्र, पावसामुळे यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. अणुस्कुरा घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील वाहने या घाटातून धावतात.

याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. दरम्यान, घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT