kolhapur, Kolhapur Market Committee Election, shivsena, uddhav thackeray, eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Market Committee Election News : कोल्हापूरातून ठिणगी; 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी' ला उद्धव ठाकरे गटाचा 'जय महाराष्ट्र'

काेल्हापूर बाजार समिती निवडणुकीची रंगत वाढणार ?

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur APMC Election News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय वैर आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (kolhapur market committee election) इरेला पेटल्याचे दिसून आले. ठाकरे गटाने आज (शुक्रवार) राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीत शिंदे गट असल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जाहीर केला.

जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले आमचे नेते उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर वार करणाऱ्या शिंदे गटा सोबत आम्ही जाणार नाही. अशा 100 बाजार समिती आम्ही सोडू पण शिंदे गटा सोबत जाणार नाही.

जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले बाजार समितीच्या आता पर्यंत जाहीर झालेल्या पॅनलमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा कोणताही संबंध नाही. या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहणार आहाेत. आमची भूमिका ठाम असल्याचे पवार आणि देवणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील राजकारणाचे पडसाद हे काेल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहवयास मिळू लागले आहे. आता बाजार समितीत काेणत्या आघाडीला जास्त (एकूण 18 उमेदवार) जागा मिळणार हे निकालानंतर स्पष्ट हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

SCROLL FOR NEXT