Kolhapur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Kolhapur Accident News: सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी झाले आहेत.

Satish Daud

Kolhapur Vathar Flyover Accident

कोल्हापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ रविवारी (ता. १७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिन धनवडे (वय ४०) बाबालाल इमाम मुजावर (वय ५०), विकास वड्ड (वय ३२), श्रीकेश्वर पासवान (वय ६०) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथून काही मजुरांचा गट कोल्हापूर (Kolhapur) शहरानजीक असलेल्या शिये गावात रविवारी स्लॅब टाकणारे मिक्सर घेऊन कामासाठी आला होता. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या सुमारास मजूर घरी जाण्यासाठी निघाले.

मजुरांच्या टेम्पोला पाठीमागून स्लॅब टाकणारा मिक्सर जोडलेला होता. यावेळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे सर्विस रोडला त्यांचा टेम्पो आला. दुसऱ्या दिवशी याठिकाणी काँक्रीटचे काम करायचे असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन तिथेच सोडून जाण्यासाठी टेम्पोमधील मजूर खाली उतरले.

मिक्सर साईडला पार्क करीत असताना कोल्हापूरकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या सर्व मजुरांना क्षणार्धात उडविले. अपघात इतका भीषण होता, की ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ८ जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड सुरू झाली.

अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत मजूर हे रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT