२३ ते २६ जानेवारी सलग सुट्ट्यांमुळे कोकण प्रवास वाढणार
मुंबई–सावंतवाडी आणि चिपळूण विशेष ट्रेनची मागणी
तिकीट वेटिंग कमी करण्यासाठी अतिरिक्त गाड्यांची गरज
कोकण विकास समितीची रेल्वे मंडळाकडे मागणी
येत्या २३ जानेवारी पासून २६ जानेवारी पर्यंत येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी, पर्यटकांची गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत. या काळात मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.
येत्या २३ जानेवारीपासून ते २६ जानेवारीपर्यंत लागोपाठ सुट्टी असल्याकारणाने कोकणवासीयांकडून मुंबई ते सावंतवाडी तसेच चिपळूण या गाड्या चालवण्याची मोठया प्रमाणावर मागणी होत होती. या काळात पर्यटक, कौटुंबिक भेटीगाठी कोकणवासीय गावाकडे रवाना होतात. काही जण गावी जाण्यासाठी आधीच ट्रेनचं बुकिंग करतात. तर काहींना प्रावासासाठी तिकीट मिळत नसल्याने त्यांना वेटिंगवर राहवं लागत.
त्या पार्श्वभूमीवर मुंबई ते सावंतवाडी रोड, पुणे ते सावंतवाडी रोड, मुंबई ते चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालवण्यात यावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे मंडळाकडे केली आहे. पुणे-सावंतवाडी रोड-पुणे या गाडीसाठी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप हे थांबे प्रस्तावित आहेत.
सीएसएमटी-चिपळूण-सीएसएमटी या रेल्वेगाडीचे प्रस्तावित थांबे दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी हे आहेत. या नियोजनामुळे कोकणकडे जाणाऱ्या सध्याच्या रेल्वेगाड्यांवरील गर्दी कमी होईल. शिवाय वाढीव मागणीच्या काळात सुरक्षित आणि परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.