Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Nanded Shivaji Bhosale Attack News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट वादळी ठरला असून नांदेडमध्ये उमेदवाराच्या पतीवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाला. डोंबिवलीसह काही भागांत राड्याच्या घटना घडल्या असून पोलीस तपास सुरु आहे.
Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
Nanded Shivaji Bhosale Attack NewsSaam tv
Published On
Summary
  • प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नांदेडमध्ये हिंसक प्रकार घडला

  • उमेदवाराच्या पतीवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला

  • हल्लेखोरांनी धमकी देत बॅग पळवली

  • डोंबिवलीतही प्रचारादरम्यान राड्याच्या घटना समोर आल्या

संजय सूर्यवंशी, नांदेड

राज्यात २९ महापालिकांसाठी रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे ठाकरे बंधूनी मराठीचा बाणा घेऊन निवडणुकीच्या लढ्याची तलवार उचलली आहे तर दुसरीकडे महायुतीने प्रयत्न पणाला लावत सत्ता आणण्यासाठी धडपड करत आहे. तसेच आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता मतदान आणि निकालनंतरच मतदारांचा अंतिम कौल कळणार आहे. अशातच प्रचाराचा शेवटचा दिवस वादळी ठरला आहे. काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती समोर आलीय. तर काही ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला पाहायला मिळाला.

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील शंकरनगर येथे मंगळवारी सायंकाळी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचार संपल्यानंतर प्रभाग एक मधील वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवार सारिका शिवाजी भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव हे शंकरनगर येथील निवासस्थानी गल्लीतील काही लोकांसोबत गप्पा मारत खुर्चीवर बसले होते.

Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
Ravindra Chavan : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं, रवींद्र चव्हाणांचा घणाघात

याच वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी काही क्षणाच्या आत शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीचा घाव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रसंगावधान साधून शिवाजी भालेराव हे बसल्या जागी मागे सरकल्याने खुर्चीवरुन पडले आणि त्यांनी हल्लेखोराचा वार चुकवला. दोन हल्लेखोर हे तोंडाला रुमाल बांधून होते.

Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
Nandurbar : शिंदेसेनेच्या नेत्यावर दरोडा आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, भाजप नेत्याचा गंभीर आरोप, नंदुरबारचे राजकारण तापलं

दुचाकीवरुन सहा जण आल्यानंतर त्यांनी तेथे असलेली बॅगही पळवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या दृष्टीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी नांदेड पोलीस तपास करत आहेत. तर हल्लेखोरांनी 'तू प्रचार कसा करतोस, खूप भाषणं ठोकतोस. तुझी बिर्याणी करून टाकू' अशी धमकी देत हल्ला केल्याचे शिवाजी भालेराव म्हणाले.दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचा बालेकिल्ला असेलल्या डोंबिवलीत देखील अशाच प्रकारचा राडा झालेला पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com