Maharashtra BJP's Defeat Reasons Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Result 2024: भाजपच्या पराभवाची 10 कारणं, महाराष्ट्रात BJP ला का बसला फटका?

Maharashtra BJP's Defeat Reasons: लोकसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलाय. महायुतीची घसरण 42 वरून थेट 17 वर झालीय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे भाजपचा पराभव झाला? याची चर्चा आता सुरु झालीय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेच्या निकालात भाजपला मोठा दणका बसलाय. गेल्या निवडणूकीत 23 जागांवर विजय मिळालेल्या भाजपची 9 जागांपर्यंत घसरण झालीय. मात्र या घसरणीला आणि महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचं सांगत फडणवीसांनी कोणत्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला त्या कारणांची यादीच सांगितलीय...

भाजपच्या पराभवाची कारणं

1) मराठा आरक्षण आंदोलन

राज्यात मनोज जरांगे पाटलांनी सुरु केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनावर फडणवीसांनी लाठीचार्ज घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या आंदोलनाचा जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, अहमदनगर, बारामती,आणि नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातील उमेदवारांना फटका बसला.

2) कांदा निर्यातबंदी

मोदी सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीचा थेट फटका कांदा पट्ट्यातील नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डी, अहमदनगर, शिरूर आणि सोलापूर या मतदारासंघातील उमेदवारांना बसलाय...

3) संविधान बदलण्याचं नॅरेटिव्ह

भाजपचे खासदार अनंत हेगडेंसह भाजपच्या नेत्यांनी 400 जागा निवडून आल्यास संविधान बदलू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. तोच धागा काँग्रेससह महाविकास आघाडीने उचलत या मुद्द्यावर आक्रमक प्रचार केला. त्यामुळे दलित, आदिवासींनी भाजपकडे पाठ फिरवली. विदर्भ, खान्देशातील आदिवासी पट्ट्यात भाजपची पिछेहाट झाली. दलित मतंही भाजपपासून दुरावल्याचा फटका बसला.

4) पक्षांअंतर्गत कुरघोडी

महायुतीतील तीन पक्ष एकत्र आल्याने मित्र पक्षातील नेत्यांबद्दल सुरु असलेल्या कुरघोडीचा परिणाम निकालात दिसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय...

5) अतिआक्रमक हिंदूत्व

भाजपने महाराष्ट्रात अतिआक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार केला. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज महायुतीपासून दुरावला.

6) भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांसोबत युती

भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांना सोबत घेतलं. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार महायुतीपासून दुरावला.

7) फोडाफोडीच्या राजकारणाचाही फटका

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले ही गोष्ट राज्यातील जनतेला रुचली नाही. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाचाही मोठा फटका भाजपला बसला.

8) अतिआत्मविश्वास नडला

लोकांच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत भाजपने 400 पारचा नारा दिला. त्यातच मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून लोक मतदान करतील हा अतिआत्मविश्वास भाजपला चांगलाच नडलाय...

9) भाजपचं गुजरातप्रेम

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याचा मुद्दा महाविकास आघाडीने प्रचारातील आक्रमकपणे मांडला. तसंच महाराष्ट्राच्या तुलनेत मोदी सरकारनं गुजरातला झुकतं माप दिल्याचा आरोप केला.

10) ठाकरे-पवारांना मिळालेली सहानभूती

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर त्याची थेट सहानुभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळाली. त्यामुळे भाजप विरोधात नाराजीची लाट निर्माण झाली.

याच कारणामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि भाजपची पिछेहाट झाल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे यातून भाजप काय धडा घेणार? आणि विधानसभेसाठी नवीन काय रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT