Maharashtra Politics: केंद्रात सत्तास्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली? शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी बैठका सुरू असताना इंडिया आघाडीनंही दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
केंद्रात सत्तास्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली? शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात?
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv

भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या खऱ्या मात्र स्वबळावर सत्तास्थापनेचं स्वप्न भंगलं. त्यामुळे आता एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं लागणार आहे. याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न आता इंडिया आघाडीनं सुरू केलाय. त्यामुळे इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यात सर्वाधिक पुढाकार घेतलाय तो उद्धव ठाकरेंनी राज्यात मविआला मोठं यश मिळालंय. तर महायुतीचा मोठ्या फटका बसलाय. मात्र यात शिंदेंच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केलीय. त्यामुऴे गरज भासल्यास उद्धव ठाकरे शिंदे गटातल्या खासदारांना तोडून एनडीएला झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

केंद्रात सत्तास्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली? शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात?
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्रीपद सोडणार? मुख्यमंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला फोन; काय झाली चर्चा?

एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. यात चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला 16 मिळाल्या आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूनं 12 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. इतर मित्र पक्षांनी 17 जागा मिळवल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेसाठी 38 जागांची गरज आहे. जर टीडीपी, जेडीयू आणि शिंदे गटातील खासदार इंडियात आले तर सत्तेच समीकरणं जुऴवणं अधिक सोप्प होणार आहे.

केंद्रात सत्तास्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचाली? शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात?
Kalyan Politics: शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल

त्यामुळेच शिंदे गटातले सात खासदार आता उद्धव ठाकरेंच्या रडारवर आले आहेत. आधीच मविआला मिलालेल्या मोठ्या यशामुळे शिंदे गटातल्या खासदार आणि आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा रंगतेय. याचाच फायदा घेण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरू झालेल्या तोडफोडीच्या राजकारणाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातल्या घडामोडींसह महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींकडेही साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com