Aurangabad Crime News, Aurangabad Kirtankar Maharaj News Updates डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला 'कीर्तनकार महाराज' पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या रंगेल महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी (police) अटक करण्यात आली आहे. (Aurangabad Kirtankar Maharaj News Updates)

हे देखील पहा-

गंगापूर येथील न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने महाराजास जामीन मंजूर केला. गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये संताप व्यक्त होत होता. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकार महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार दिली होती. अखेर आज पोलिसांनी या महाराजाला ताब्यात घेतले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT