Ellora Caves saam tv
महाराष्ट्र

Ellora Caves: वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव सोहळा; हजारो पर्यटक वेरुळमध्ये दाखल

Verul Leni: वेरूळ लेणीतील दहा नंबर लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव सोहळा सोमवारी पर्यटक आणि भाविकांसाठी आयोजित करण्यात आला.

Dhanshri Shintre

ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव सोहळा सोमवारी पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. दरवरषी लेणी क्र १० च्या मध्ये १० आणि ११ मार्च या दिवशी ४.३० ते ५.१५ च्या दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर येऊन प्रकाशमान होतात ही तेजाची तेजाशी भेट आहे.

किरणोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो पर्यटक वेरुळमध्ये दाखल झाले होते. हे सर्व व्हिडिओ मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी साम टिव्हीकडे पाठवले आहेत. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. यामध्ये १२ बौद्ध लेणी आहेत. तर यातील १० नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. १० क्रमांकाच्या लेणीमधील तथागतांचे भव्य शिल्प, चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मन:शांती देणारे आहे. या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात.

दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर येऊन प्रकाशमान होतात ही तेजाची तेजाशी भेट आहे. हा अद्भूत आणि नैन्यरम्य किरणोत्सव पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो पर्यटक सोमवारी (दि.१०) वेरुळ येथे दाखल झाले होते. मात्र, पर्यटकांची संख्या प्रचंड असल्याने काही जणांना लेणीच्या बाहेरच थांबावे लागले. उपस्थितांनी हा किरणोत्सव पाहून आनंद व्यक्त केला. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल.

मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी पर्यटकांना किरणोत्सवासह लेण्यांच्या विविध वैशिष्टांची माहिती दिली. महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. तर गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात ही आहे. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली (पिंपळ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात.

भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविन्याची प्रथा होती, असेही डॉ. पाईकराव यांनी सांगितले. यावेळी अशोक नगरे, सुरज जगताप, डॉ सोनाली म्हस्के, अरविंद जोगदंड, प्राचार्य गायकवाड, सुनिल खरे, दिपक गायकवाड, डॉ राहुल बचाटे व इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT