kirit somaiya & uddhav thackeray Saam Tv News
महाराष्ट्र

ठाकरे सरकार मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मग्न : साेमय्या

अखेर ठाकरे सरकारला याची किंमत माेजावी लागणार असे साेमय्या यांनी नमूद केले.

अरुण जोशी

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले असून मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहेत अशी टीका भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) यांनी येथे केली. साेमय्या हे आज (मंगळवार) अमरावती दाै-यावर आले आहेत. येथे घडलेल्या हिंसाचारानंतर साेमय्या नुकासग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या हिंसाचार बाबत बाेलताना साेमय्या म्हणाले राज्य सरकारला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.

(स्व.) बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फरक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी यास हिंसाचार म्हटलं नसते. बाळासाहेब नेहमीच मुस्लिमांविरुद्ध (चुकीचे करणा-यांना) रोखठोक भूमिका घेत असे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले असून मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहेत. इतक्या माेठ्या प्रमाणात माेर्चे निघाले कसे. राज्य सरकारने त्याला समर्थन दिलेच कसे असा प्रश्न साेमय्या यांनी उपस्थित केला.

साेमय्या म्हणाले हे माफियांचे सरकार आहे. काेल्हापूरला सरकारमधील मंत्री त्याच्या जावायास काेट्यावधींची निविदा मंजूर करुन देताे. तेथे जायचे म्हटलं तर मला राेखले जाते. येथे माेर्चे काढले जातात. येथे मी येणार म्हटलं की लगेच प्रतिबंध घातला जाताे. हिंदूची दुकाने फाेडली जातात. अखेर ठाकरे सरकारला याची किंमत माेजावी लागणार असे साेमय्या यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT