Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद
Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद Saam TV
महाराष्ट्र

Nanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड (Nanded) मध्ये रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील शारदा नगर परिसरातील राज रेसेडन्सी परिसरात ही घटना घडल्याने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशाल धुमाळ असं खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तीन तरूणांनी मिळून मोटारसायकलवरुन पाठलाग करुन विशालचा खुन केल्याची संपुर्ण धक्काकायक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

20 हजारासाठी हा खुन झाल्याची प्राथकमिक माहिती असून, विशालवर खंजीरने सपासप वार केल्याने स्थानिक नागरिकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला, विशालनेही जिव वाचविण्यासाठी राज रेसेडन्सी कडे धावला मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत तो जागेवरच कोसळला आणि अतिरक्तस्त्रावामुळे विशालचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पहा -

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी विशालच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशालवर हल्ला करणारे तिघांनाही पोलिसांनी 24 तासाच्या आत रात्री उशिरा अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arya Ambekar: कितीदा नव्याने तुला पाहावे, मनात फक्त तुला जपावे

Today's Marathi News Live : पुण्यात शिवसंग्राम संघटनेची आज महत्वाची बैठक

Kitchen Hacks: लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही सुकतात,तर ट्राय करा 'या' टीप्स

Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात सव्वा महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?

BSNL: एकच नंबर! BSNLचा जबरदस्त प्लान;४२५ दिवस विसरा रिचार्जचा ताण; अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटाही मिळेल भरपूर

SCROLL FOR NEXT