औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा (woman) नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापला आहे. ही घटना शहरातील (city) गुलमंडी या भागामध्ये घडली आहे. बाजारात (market) खरेदी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेचा पतंगाच्या नायलॉन मांज्याने गळा कापला गेल्याने औरंगाबाद (Aurangabad) शहरात पुन्हा नायलॉन मांजचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे देखील पहा-
नायलॉन मांजामुळे शुभांगी वारद यांना खासगी रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय शुभांगी सुनील वारद या बुधवारी सायंकाळी गुलमंडीवर खरेदीसाठी जात होते. खरेदी झाल्यानंतर त्या दुचाकी घेऊन घरी निघाल्या असता गुलमंडी परिसरात त्यांच्यासमोर अचानक आलेला पतंगाचा (Kite) नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला.
कुणी तरी हा दोरा ओढल्यासारखे झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी थांबवून गळ्यात अडकलेला दोर पकडला. तोपर्यंत त्यांचा गळा चिरला गेल्याने झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले. ही बाब त्यांनी त्याच्या पतीला कळवली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav