Khopoli Mangesh Kalokhe Killing Case: saam tv
महाराष्ट्र

Khopoli Crime: माजी नगरसेवक मंगेश काळोखेंच्या हत्येचं पुणे कनेक्शन; मारेकऱ्यांना सुपारी कोणी दिली? चौकशीत मोठा खुलासा

Khopoli Mangesh Kalokhe Killing Case: माजी नगरसेवक मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. वानवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काळोखे यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट करण्यात आल्याची माहिती उघड झालीय.

Bharat Jadhav

  • माजी नगरसेवक मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठा खुलासा

  • पुण्यातून मुख्य आरोपीची अटक, पुणे कनेक्शन स्पष्ट

  • आरोपीने सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली

खोपोलीमधील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्ये प्रकरणातील फरार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने काळोखेंच्या सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिलीय. खालीद खलील कुरेशी (वय २३) हा हडपसरमधील सय्यदनगर मध्ये राहतो. खुलील कुरेशीला पोलिसांनी काळोखे हत्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

एका चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी या ओरापीला अटक केली. हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकाविण्यात आली होती. याचा तपास सुरू असताना उमर नूर खान, साहिल हबीब फकीरला अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी करण्यात आली.

तेव्हा खालीद कुरेशी हा खून करून पसार झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला. त्यादरम्यान वानवडी पोलिसांना खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचत खालिदला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्याचा गुन्हा कबुल केला. दोन मित्रांशी संगनमत करून खून केल्याची कबुली त्याने दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, सर्फराज देशमुख, दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे आणि विठ्ठल चोरमले यांनी ही कारवाई केली.

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या २६ डिसेंबर रोजी झाली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काळोखे यांचा खून करणारा एक मारेकरी पोलिसांच्या हाती लागला असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर हत्येतील मास्टरमाइंड कोण आहे हे लवकरच समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: रोज चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय होते?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हॉटेल अन् ढाब्यासारखं घरीच झटपट बनवा झणझणीत ‘पनीर खिमा मसाला’

निवडणुकीनंतर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट|VIDEO

India Tourism : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? 99% लोकांना माहित नसेल

SCROLL FOR NEXT