Ratnagiri News , Sanjay Kadam, Khed Panchayat Samiti News saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : माजी आमदार संजय कदमांसह उद्धव ठाकरे गटाच्या २५ जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

Siddharth Latkar

- जितेश कोळी

Ratnagiri News : खेड पंचायत समितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटात एका बैठकीत झालेल्या राड्यानंतर माजी आमदार संजय कदम (former mla sanjay kadam)यांच्यासह उद्धव ठाकरे गटाच्या २० ते २५ जणांविरोधात खेडच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी पाेलिसांत (khed police) दिली हाेती. (Maharashtra News)

शिंदे गटाचे तालुकप्रमुख सचिन धाडवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी आमदार संजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला लाठ्या - काठ्यांनी मारहाण करण्यासाठी आपला पाठलाग केला असल्याचे नमूद केले आहे. तसेच संजय कदम यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचेही धाडवे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात (कलम १४३, १४४, १४७ अंतर्गत) माजी आमदार संजय कदम यांच्या 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वाभूमीवर शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये आता एकमेकांना शह देण्यासाठी राजकीय खेळी करण्याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने उभ्या वाहनांना उडविले, दोघे गंभीर

Goa Tourism: गोव्याला जायचंय, पण खर्च खिशाला परवडत नाहीये? पाहा बजेट फ्रेंडली गोवा ट्रिप

Green Vegetable Shopping : पावसाळ्यात पालेभाज्या खरेदी करताना ५ गोष्टींची घ्या खबरदारी

Pune Ganeshotsav : 'डीजे'ला विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशीची परवानगी घेण्याची गरज नाही

Maharashtra Live News Update : शेअर मार्केट फसवणुकीत चक्क चित्रपट निर्मात्याचा सहभाग

SCROLL FOR NEXT