khamgoan police arrests farmer for hitting punjab national bank manager near buldhana Saam Digital
महाराष्ट्र

Crime News : पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकावर चाकू हल्ला, एकास अटक

Buldhana Crime News : या घटनेनंतर तात्काळ बँक कर्मचाऱ्यांनी बँक व्यवस्थापकास खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

पंजाब नॅशनल बँकेच्या (punjab national bank) व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतक-यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी घटनेच्या चाैकशी आणि तपासाअंती संबंधित शेतकरी यास रात्री उशिरा अटक केली. (Maharashtra News)

याबाबत मिळालेली माहिती अशी - शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा खामगाव येथील पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकासोबत शाब्दिक वाद झाला. यातून शेतकऱ्याने सोबत आणलेल्या चाकूने बँक व्यवस्थापकावर् कार्यालयातच हल्ला केला.

या धक्कादायक प्रकारामुळे बँकेत धावपळ उडाली. बँक व्यवस्थापकास वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सहाय्यकाला सुद्धा शेतकऱ्याने जखमी केले. या घटनेनंतर तात्काळ बँक कर्मचाऱ्यांनी बँक व्यवस्थापकास खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पाेलिसांनी शेतकरी किरण गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी गायकवाड याचा शाेध घेत त्यास रात्री उशिरा अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT