kdmc police  Saam tv
महाराष्ट्र

KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट; शहरात तगडा फौजफाटा तैनात, अवैध दारूविक्री विरोधातही कारवाई

KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झालेत. शहरात तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधातही कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अलर्ट

शहरात पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात

शेकडो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल २४ ड्रोन शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत असून एसआरपीएफचे ९ प्लॅटून देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक कारवाई करत २५२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन देशी कट्टे, सूरा, चॉपर, तलवारसह एकूण ५२ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अवैध दारूविक्रीविरोधात कडक पावले उचलत १०७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातून ७८० लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शक पार पडावी यासाठी ८ एसीपी, ४५ पोलीस निरीक्षक, २९३ अधिकारी, २१३४ पोलीस कर्मचारी, १४५६ होमगार्ड आणि ९ प्लॅटून असा भक्कम पोलीस बंदोबस्त शहरभर तैनात करण्यात आला आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून उपयुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

Tilak Verma: टीम इंडियाच्या टी २० वर्ल्डकप मिशनला जबरा धक्का; भारत-न्यूझीलंड मालिकेतील ३ सामन्यांमधून धुरंधर तिलक वर्मा बाहेर

बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका, ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT