काशीद समुद्रात दोन पर्यटक बुडाले तर तिसऱ्याला वाचवण्यात यश (Video) Saam TV
महाराष्ट्र

काशीद समुद्रात दोन पर्यटक बुडाले तर तिसऱ्याला वाचवण्यात यश (Video)

साम टिव्ही ब्युरो

रायगड: मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेल्या तीन पर्यटकांपैकी दोन जण बुडल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. तर तिसऱ्या पर्यटकाला समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. बुडालेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढले असून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. तर वाचलेल्या पर्यटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या पर्यटकांनी मद्यप्राशन केले असल्याचे बोलले जात आहे. लालतु नासकर (27) आणि पलटू सूत्रधर (38) अशी मृत झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. पुणे येथून दोन बसने 18 पर्यटक मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पर्यटनास आले होते. मूळचे हे पर्यटक कोलकत्ता येथील असून कामानिमित्त पुणे येथील एका कंपनीत आहेत. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पर्यटक हे काशीद समुद्रकिनारी आले.

समुद्राचे पाणी पाहताच पोहण्याचा मोह न आवरल्याने सर्वजण समुद्राच्या पाण्यात पोहण्यास उतरले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने या पर्यटकांपैकी तीन पर्यटक हे बुडू लागले. त्याचवेळी समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अमोल कासार आणि त्याच्या सदस्यांनी समुद्रात उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तिघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यावेळी दोघांची परिस्थिती नाजूक असून त्याचा श्वास सुरू होता. मात्र बोर्ली येथे रुग्णालयात नेईपर्यत त्यांचा मृत्यू झाला. तिसरा पर्यटक हा सुखरूप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT