Voting
Voting Saam Tv
महाराष्ट्र

Kasba Chinchwad Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारांना मिळणार या सवलती; शासनाचे परिपत्रक जाहीर

साम टिव्ही ब्युरो

Kasba Chinchwad Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोनिवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मतदान करता यावे यासाठी २६ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने प्रसृत केले आहे.(Latest Kasba Chinchwad Election News)

दरम्यान, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी , तर कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल,तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

पुण्यात सर्वाधिक ऊस पिकाची नोंदणी

महसूल विभागाच्या ई-पीक पाहणीमध्ये बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे. नगदी पिकांच्या लागवडीबरोबरच हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांची देखील आकडेवारी या उपयोजनच्या (अँप) माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.

महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या उपयोजनमध्ये करता येते.त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षांसाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

SCROLL FOR NEXT