Karuna Sharma dhananjay munde and pankaja munde Saam Tv
महाराष्ट्र

Karuna Sharma : 'तोंड उघडलं तर मुंडे भावंडांना राजीनामा द्यावा लागेल' करुणा मुंडेंचा पंकजा-धनंजय मुंडेंना इशारा

Karuna Sharma Statement : कोर्टातली लढाई जिंकल्यानंतर आता करूणा मुंडेंनी धक्कादायक दावा केलाय. धनंजय मुंडेच नव्हे तर पंकजा मुंडेंचही मंत्रिपद जाणार असा दावा करूणा मुंडेंनी केलाय...नेमका काय आहे हा दावा? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

Karuna Sharma : धनंजय मुंडेंच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपायला तयार नाही असंच म्हणावं लागेल. कारण करुणा मुंडेंना महिना २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यानंतर आता करूणा मुंडे अधिकच आक्रमक झाल्या आहेत.

आपण तोंड उघडलं तर धनंजय आणि पंकजा मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असा इशाराच त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर त्यांना वाल्मिक कराडच्या प्रकरणात करूणा मुंडेंनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. कराडला वाचवण्यामागे धनंजय मुंडेंच असून मला इंदूरला पाठवताना कराडनं मारहाण केल्याचा आरोपही करूण मुंडेंनी केलाय.

आधीच अनेक प्रकरणांमुळे अडचणीत असलेल्या धनंजय मुंडेंना करूणा मुंडेंनी घेरलंय.त्यात करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आणि यामुळेच करूणा मुंडेंचा घातपात होऊ शकतो. त्यांना सुरक्षा पुरवायला हवी अशी मागणी अंजित दमानियांनी केलीय.

सरपंच हत्याकांडनंतर वाल्मिक कराडसोबतचे संबंध, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि युरिया घोटाळ्याचे आरोप ताजे असताना करुणा मुंडेंनीही काही धक्कादायक खुलासे केल्यामुळे धनंजय मुंडेंचं टेंशन आणखीनच वाढलंय. मात्र यामुळे करूणा मुंडेंचा जीव खरंच धोक्यात आहे का? असेल तर सरकार त्यांना सुरक्षा पुरवणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT