मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली. याचदरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि आपली भेट कशी झाली? हे सांगितलं आहे. त्या 'साम टीव्ही'च्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात बोलत होत्या.
करुणा शर्मा म्हणाल्या की, एक महंत होते भैय्यू महाराज त्यांचं आश्रम इंदोरमधील सुकल्याग्राममध्ये होतं. जिकडे मी राहत होती. त्यांच्या आश्रममध्ये गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडेंसह महाराष्ट्रातील अनेक मोठे मंत्री तिथे येत असत. आता त्या महाराजांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली. त्या आश्रममध्ये आमच्या दोघांची भेट झाली. मुंबईत तुम्ही कशा आल्या? असा सवाल केला असता त्या म्हणाल्या की, लग्नानंतर धनंजय मुंडे मला घेऊन आले. आमचं लग्न इंदोरमध्ये झालं. महाराजांच्या आश्रमामध्ये आमची अचानक ओळख झाली. मी त्या आश्रममध्ये जात देखील नव्हती, कारण माझा या गोष्टींवर विश्वास नाही. एकदा मी माझ्या आईसोबत गेली असता त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि आमची ओळख झाली.
करुणा शर्मा यांनी या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत. जेव्हा मी अब्रू नुकसानीचा दावा केला तेव्हा मला ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सांगण्यासाठी मला ५० कोटींची ऑफर दिली होती. १८ कोटी कोर्टाच्यासमोर देणार आणि बाकीची रक्कम बाहेर देणार असं त्यावेळी ठरलं होतं, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
धनजंय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होतं. ते पुण्यातील कॉलेजमधून मला भेटण्यासाठी इंदोरला येत होते. आठवड्यातून दोन वेळा ते गाडीने मला भेटायला यायचे. मी पण इंदोरवरून पुण्याला जात होते. लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या कुटुंबाला तीन ते चारवेळा भेटली आहे. तुमच्या आई-वडिलांकडे घेऊन जा, असं मी त्यांना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी माझे आई-वडील नाहीत असं मला सांगितल होतं, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.