करुणा मुंडेंनी केली नव्या पक्षाची घोषणा; धनंजय मुंडें विरोधात निवडणूक लढवण्याचीही तयारी SaamTV
महाराष्ट्र

करुणा मुंडेंनी केली नव्या पक्षाची घोषणा; धनंजय मुंडें विरोधात निवडणूक लढवण्याचीही तयारी

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांच्या पत्नीने माझ्या पक्षात येण्यास सहमती दाखवली आहे, योग्य वेळी मी ते नाव जाहीर करणार.'

गोविंद साळुंके

अहमदनगर : एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात पाहतेय की अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतोय. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा, अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव 'शिवशक्ती सेना' असेल असं करुणा धनंजय मुंडे यांनी (Karuna Munde) अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

आपण हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार असून या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल, गरज पडली तर मी स्वतः परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असें त्यांनी यावेळी सांगितलं. आज समाजकारण करताना मला पॉवर मध्ये असणे गरजेचे वाटले त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करत आहे असही त्या म्हणाल्या.

हे देखील पहा -

फक्त पोलिसांचा बळी दिला जातोय -

समीर वानखेडेंसारख्या (Samir Wankhede) अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आंहे. मात्र दुसरीकडे अजित पवार, (Ajit Pawar) धनंजय मुंडेंकडे 1500 करोड, 900 करोड अशा मालमत्ता असल्याचे बोलले जातेय. मात्र यात केस दाखल होत नाही आणि अटकही होत नाही. त्यामुळे आता मी माझे जीवन जनसेवे साठी समर्पित करत असल्याचही करुणा मुंडे म्हणाल्या. दरम्यान घरामध्ये मी राजकारण पाहिलं, पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिले आहे. सध्या तीन पक्षांचे सरकार आहे, फक्त पोलिसांचा बळी दिला जातोय. याची उदाहरणे परमबीर सिंग, वानखेडे यांना भोगावे लागले असेही आरोप त्यांनी केले. तसंच राज्यातील जनतेला आवाहन आहेकी, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान एकत्र या एक नवी पहल मी करत आहे. मी माझ्या पतीला सुद्धा माझ्या पार्टीत नाकारेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आपल्या पत्नींना गप्प केलं आहे. आज राज्यातील सर्व समाजसेविना आवाहन करते, आपण हिरे आहात एकत्र या, या माझ्या मोहिमेत एकत्र या असे आवाहन करताना आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका मंत्र्यांच्या पत्नीने माझ्या पक्षात येण्यास सहमती दाखवली आहे, योग्य वेळी मी ते नाव जाहीर करेल असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT