Eknath Shinde performs Kartiki Ekadashi Mahapuja at Pandharpur with lakhs of devotees present Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

Eknath Shinde Kartiki Ekadashi Mahapuja Pandharpur live : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. नांदेडच्या वारकरी दाम्पत्याला मानाचा महापूजेचा मान मिळाला. लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून शिंदेंनी राज्यावरील नैसर्गिक अरिष्ट दूर व्हावे अशी प्रार्थना केली.

Namdeo Kumbhar

भारत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी

DCM Eknath Shinde Kartiki Ekadashi Mahapuja 2025 : कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला. राज्यावरील आलेलं नैसर्गिक अरिष्ट दूर होऊ दे, असे साकडे एकनाथ शिंदे यांनी विठुमाऊलीकडे घातले.

कार्तिकी एकादशीची विठ्ठल रखुमाईची आज पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटी गावातील वारकरी रामराव वालेगावकर यांच्यासह मोहोळ तालुक्यातील पापरी व देवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापूजेवेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. कार्तिकी एकादशीनिमित्त आज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. कार्तिकीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सहा लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत.

राज्यावरील आलेलं नैसर्गिक अरिष्ट दूर होऊ दे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साकडे

राज्यावर आलेलं नैसर्गिक संकट लवकर दूर होऊ दे, माझा बळीराजा सुखी समाधानी राहू दे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.

पंढरपूरमध्ये आल्यानंतर वेगळे समाधान मिळते. महापूजा करण्याचे भाग्य मिळाले. बळीराजा संकटात आहे. त्याच्यावरील अरिष्ट दूर कर,मंत्री मंडळाने 32 हजार कोटींचे मदत दिली. कर्जमाफी उपाय बाबत सरकारने निर्णय घेतला. त्याची शिफारस एप्रिलमध्ये येईल. पांडुरंगाकडे साकडे घातले शेतकरी वारकरी लाडक्या बहिणी सगळ्याचे जीवनात सुख समाधान आनंदाचे दिवस येऊ दे. सगळे अरिष्ट दूर होऊ दे. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक होऊ दे असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांच्या विकासा आराखड्याला मंजुरी

पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे. ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर विकास खात्याने चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर केला आहे. यामधून पंढरपूर शहरांमध्ये ड्रेनेजसह महिला मिश्रित येणारे पाणी बंद केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील कामाच्या आणि विकासाच्या जोरावर महायुतीला लोक पाठिंबा देतील, असा आशावादही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

SCROLL FOR NEXT