Kartiki Ekadashi 2023 Saam TV
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी सोहळ्यानिमित्त आनंदाची बातमी; प्रशासनाकडून रांगेतील भाविकांसाठी बाकांची व्यवस्था

Kartiki Ekadashi 2023: विश्रांतीसाठी चार मंडप उभे केले जाणार आहेत. यामध्ये पंखे आणि कुलरची व्यवस्था देखील केली आहे. जवळच वैद्यकीय उपचाराची ही सोय केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत नागणे

Kartiki Ekadashi 2023:

पंढरपुरात 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकीचा सोहळा साजरा होणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपुरात येतील असा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा प्रथमच दर्शन रांगेतील भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय विश्रांतीसाठी चार मंडप उभे केले जाणार आहेत. यामध्ये पंखे आणि कुलरची व्यवस्था देखील केली आहे. जवळच वैद्यकीय उपचाराची ही सोय केली आहे.

यंदा प्रथमच कार्तिकी यात्रेमध्ये दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी टोकन देण्याचा विचार सुरू आहे. रांगेत उभे असताना भाविकाला थकवा जाणवल्यास भाविकांच्या आरामाची सुविधा दर्शन रांगेतच केली जाणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. हे भाविक आराम करण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा दर्शन रांगेमध्ये येण्यासाठी आता टोकन व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेतली. तसेच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी बॅरिगेटिंग मधील अंतर कमी करण्यात येणार आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व निर्मळ पाण्यामध्ये स्नान करता याव यासाठी उजनी धरणातून 14 नोव्हेंबर रोजी चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Beed News: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचे वाजले तीन-तेरा|VIDEO

SCROLL FOR NEXT