Karnataka Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून एकाचवेळी ६ जणांची हत्या

Karnataka Crime: कर्नाटकमध्ये भयंकर घटना घडली. एकाचवेळी गोळ्या झाडून सहा जणांची हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली.

Priya More
  • कर्नाटकात जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या

  • विजापूर जिल्ह्यात घडली घटना

  • चडचण गावातील हत्याकांडाने कर्नाटक हादरले

  • जमिनीच्या वादातून घडला रक्तरंजित थरार

विश्वभूषण लिमये, सोलापूर

कर्नाटकातून हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. एकाचवेळी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेमुळे कर्नाटक हादरले. या घटनेमुळे आसपासच्या गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. नेमकं काय घडलं याचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या विजापूर जिल्ह्यातील चडचण भागात जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या करण्यात आली. एकाचवेळी गोळ्या झाडून सहा जणांना जागीच संपवण्यात आले. सोलापूर आणि विजापूर जिल्ह्याला जोडणाराऱ्या भीमा नदीच्या २ किमी पल्याड ही भयंकर हत्याकांडाची घटना घडली. याबाबत विजापूर जिल्ह्यातील चडचण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस तपास करत आहेत. दरम्यान या गावात अशाप्रकारच्या हत्येचा इतिहास असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या भीषण घटनेत ६ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला.

या थरारक गोळीपारात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT