sangli 
महाराष्ट्र

मराठी भाषिकांवरील हल्ले थांबवावेत : महापौर दिग्विजय सूर्यवंशी

या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विजय पाटील

सांगली : सीमा प्रश्नाचा वाद महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे ताबडतोब पाठपुरावा करून बेळगाव (belgaum) सीमा भागातील मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवावी अशी मागणी सांगली (sangli)येथे मराठी भाषिक आंदाेलकांनी केली.

कर्नाटकातील बेळगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा सांगलीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. समितीचे जिल्हा अध्यक्ष महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हा सीमा प्रश्न महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे ताबडतोब पाठपुरावा करून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवावी.

त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे, मराठीची गळचेपी चालू आहे ती थांबवावी. बेळगाव सीमावर्ती भाग आणि बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, संतपुर बरोबर ८५० गावे ही केंद्रशासित करावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चैधारी यांना समितीच्यावतीने देण्यात आले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Water Benefits: त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर बडीशेपचे पाणी, असा करा सोपा पद्धतीने वापर

नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवरच मारली उडी! पत्नीसोबत पुढे काय झालं? व्हिडिओ व्हायरल

भाजपला मोठा धक्का, उमेदवारी नाकारल्याने गडकरींचे खंदे समर्थक बंडाच्या तयारीत, पदवीधरमध्ये मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: पितळेचे ‘सोन्याचे बिस्कीट’ देऊन महिलेचे तीन तोळे दागिने लुबाडले; आरोपी बीडमधून अटक

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

SCROLL FOR NEXT