Political News Saam TV
महाराष्ट्र

Karnataka Assembly Election: भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP Leader Puttanna Joined Congress: पुत्तन्ना यांनी भाजपची साथ सोडल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka News: राजकीय वर्तृळातून एक मोठं वृत्त समोर आलं आहे. भाजपचे दिग्गज नेते पुत्तन्ना यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुत्तन्ना यांनी भाजपची साथ सोडल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Karnataka assembly election News)

गुरूवारी पुत्तन्ना यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. ते चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. पुत्तन्ना यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यावर भाजपला जोरदार झटका बसला आहे.

पुत्तन्ना यांनी या आधी बेंगळुरू ग्रामीण आणि रामनगर जिल्ह्यांतील शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच बेंगळुरू अर्बन येथे देखील शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. ते ४ वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेत. ऑक्टोबर २०२० मध्ये विधान परिषदेवर पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०२६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. त्या आधीच त्यांनी भाजपची साथ सोडली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, एलओपी सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पुत्तन्ना यांना काँग्रेसचं सदस्यत्व देण्यात आलं. पुत्तन्ना यांच्यावर भाजपच्या एमएलसी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा पदभार होता. बुधवारी आपल्या वैयक्तिक कारणास्तव त्यांनी या दोन्ही पदांचा राजिनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

SCROLL FOR NEXT