Manish Sisodia: मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून मंजूर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे...
Manish Sisodia
Manish SisodiaSaam Tv

Delhi: दिल्लीच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत असून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे...

Manish Sisodia
MSRTC: एसटी महामंडळाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याची महत्वाची बैठक; पगाराबाबत घेतला मोठा निर्णय..

मनिष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण ८ विभाग होते. त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल ९ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी मनिष सिसोदिया यांना ताब्यात घेतले होते. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या 33 पैकी 18 विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन नऊ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यापासून विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Manish Sisodia
Dhairyashil Patil: 'शेकाप'ला मोठा धक्का! माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

तसेच तुरुंगात असतानाही सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री पदावर होते. या दोघांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे की, यामुळे काम थांबणार नाही आणि भाजप आपल्या योजनेत यशस्वी होणार नाही. (Latest Marathi Update)

दरम्यान, मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com