Karjat rain update 100-year rain record : चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी मॉन्सूनने तळ कोकणात वर्दी दिली, त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढला. सोमवारी पहाटेपासूनच मुंबई, रायगड, नवी मुंबई, पुण्यासह राज्यभरात धुंवाधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आलाय, तर काही गावांचा संपर्क तुटलाय. धो धो पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. रायगडमधील कर्जतमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कर्जत तालुक्यात दोन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दहिवली येथे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला. मागील १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात हा पूल पाण्याखाली गेला आहे.
कर्जत तालुक्याला दोन दिवसांपासून पावसाने झोडपले. मागील ४८ तास कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नेरळ-कळबं रोडवरील दहिवली येथील उल्हास नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे. मागील १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात हा पूल पाण्याखाली गेला आहे. नेरळ कळंब यादरम्यानची वाहतूक बंद झाली. त्यामुळे ३० ते ४० गावाचा संपर्क तुटला आहे.
मागील जवळपास १०० वर्षांत पाहिल्यांदाच मे महिन्यात कोसळलेल्या पावसात नदीला पूर आला. नेरळ कळंब यादरम्यान असलेल्या दहिवली येथे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे ४० गावचा संपर्क तुटला आहे. नेरळ ही मुख्य बाजारपेठ आहे. इथूनच आसपासची ३०-४० गावे आहेत. तिथले लोक नोकरी, धंदा आणि विविध कामासाठी जातात.नेरळ कळंब वाहतूक बंद असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
वीज कोसळून एका मुलाचा मृत्यू
कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब परिसरात रविवारी रात्रीपासून विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान बिरदोले गावात वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. रोशन कालेकर असे मृत तरूणाचे नाव आहे. आज सकाळी तो घराबाहेर पडला होता. त्याचवेळी अंगावर वीज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
रायगडला पावसाने झोडपले, 24 तासात 140.56 मिलीमिटर पावसाची नोंद
चार दिवसापूर्वी सुरू झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपले. रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील 24 तासात जोरदार पाऊस बरसला आहे. मुरुड 371, श्रीवर्धन 307, म्हसळा 300 मिमी पावसाची नोंद तर माथेरान येथे 181 मीमी, तळा 102 रोहा 166 मीमी पावसाची नोंद आहे.
रायगडमध्ये मागील 24 तासातील पाऊस :
अलिबाग - 78
मुरुड - 371
पेण - 50
पनवेल - 82.4
उरण - 55
कर्जत - 54.6
खालापुर - 62
माथेरान - 181
सुधागड - 104
माणगाव - 63
तळा - 182
महाड - 99
पोलादपुर - 94
श्रीवर्धन - 307
म्हसळा - 300
रोहा - 166
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.